राजमाता जिजाऊंच्या 421 व्या जयंतीनिमित्त भोसरीत तीन दिवसीय व्याख्यानमाला

भोजापूर वाचनालय, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजन

भोसरी – भोजापूर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्‍त विद्ममाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.10 ते 12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील नामांकित व्याख्याते उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे आयोजनाचे 14 वे वर्ष असून समाजात चांगले काम करणाऱ्या समाजसेविका तसेच ज्या मातांच्या मुलांनी देश व समाजासाठी विशेष मोलाची कामगिरी बजावली आहे, तसेच आधुनिक शिवाजी घडविणाऱ्या थोर मातांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गुरुवार दि.10 रोजी व्याख्यानमालेचे उद्‌घाटन सिक्‍कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रथम पुष्प स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु पंडित विद्यासागर गुंफणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी माजी स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अजित गव्हाणे करणार आहेत. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मेघना झुझुम तर तिसरे पुष्प गणेश शिंदे गुंफणार आहेत. दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेता दत्ता साने उपस्थित राहणार आहेत आणि उपमहापौर सचिन चिंचवडे कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत. तिसऱ्या दिवशी अध्यक्षता माजी आमदार विलास लांडे करणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, अभिनेत्री अश्‍विनी महांगडे उपस्थित राहणार आहेत.

राजमाता जिजाऊ पुरस्कार स्नेहवन या संस्थेचे अशोक देशमाने यांच्या मातोश्री सत्यभामा बाबाराम देशमाने यांना खासदार श्रीमंत उद्‌यनराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)