शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चरित्राने भाविक मंत्रमुग्ध

श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज करणार काल्याचे कीर्तन


दत्त जयंतीनिमित्त श्री दत्तगुरु सेवा मंडळातर्फे टाळगाव चिखली येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजन

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिखली – श्री दत्तगुरु सेवा मंडळ समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखली यांच्या वतीने श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या सुमधुर वाणीतून शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चरित्र कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवार दि.15 डिसेंबर 2018 ते रविवार दि. 23 डिसेंबर 2018 या कालावधीत सायंकाळी सात ते दहा दरम्यान करण्यात आले आहे.

नियोजित कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य ह.भ.प. माणिक महाराज मुखेकर शास्त्री, आळंदी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाली. या कथेमध्ये ह.भ.प. माऊली कदम यांच्या सुश्राव्य वाणीतून मंगलाचरण, पैठणचा इतिहास, संत कर्मदास, संत बहिरंभट, भानुदास चरित्र, नाथांचा जन्म, पांडुरंग दर्शन, तीर्थयात्रा, कीर्तन भक्‍ती, नाथांचा विवाह, षष्ठी तिथीचे महत्व, पंढरपुर आळंदी आदी तीर्थक्षेत्रात आगमन, ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन दासोपंताचा अभिमान, विष्णुसहस्रनामाचा नेम, गावबा आख्यान, रामायण लेखन व एकनाथ महाराज महानिर्वाण आदि विषयांवर कथा सांगितली जात आहे.

या कथेसाठी ह.भ.प. भरतआण्णा शेलार ( श्रीगोंदा) व ह.भ.प. शंकरनाना मोरे (वाई) हे गायनाची तसेच तबल्यावर ह.भ.प. लतीफ महाराज शेख, पखावजवर ह.भ.प. प्रसादमहाराज नखाते तर हार्मोनियमची साथ ह.भ.प.अंकुश भालेकर करत आहेत.

कथेच्या समारोपप्रसंगी गुरुवर्य ह.भ.प. मारुती महाराज कुर्हेकर यांची सहस्रचंद्र सोहळ्यानिमित्त तुला महोत्सव केली जाणार आहे. शनिवार दि. 22/12/2018 रोजी सायं. 4.00 ते 6.00 या वेळेत श्री दत्त जन्माचे किर्तन ह.भ.प. खंडु महाराज मोरे (चिखली) यांचे तर रविवार दि.23/12/2018 रोजी सकाळी दहा वाजता ते बारा वाजे दरम्यान काल्याचे कीर्तन जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांचे होणार आहे व त्यानंतर काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्तगुरु सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी, टाळगाव चिखली यांच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)