महापालिका ‘पीएमपी’ला दोन कोटी देणार

विद्यार्थी मोफत बस पास : स्थायी समितीची मान्यता

पिंपरी  – महापालिका शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मोफत बस पाससाठी पिंपरी-चिंचवड महापालिका दोन कोटी रुपये इतकी रक्कम पीएमपीएलला आगाऊ देणार आहे. स्थायी समिती सभेत त्याला मान्यता देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पूर्वाश्रमीच्या पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती व वेतनश्रेणीत दिला जाणारी सापत्नभावाची वागणूक, आर्थिक वाट्याच्या तुलनेत 40 टक्‍यांपेक्षा कमी प्रमाणात नादुरुस्त बस मार्गावर सोडल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत विचारणा करुनही पीएमपी प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती.

याशिवाय पिंपरीत दुसरे उपमुख्यालय स्थापन करण्याचा विषय देखील प्रलंबित होता. महापालिका महासभेला उपस्थित राहण्याकरिता वारंवार बजावूनदेखील त्याची पीएमपी प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे 5 सप्टेंबरला झालेल्या स्थायीच्या सभेत पीएमपीला आर्थिक तुटीची रक्कम न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. “पीएमपी’ची आर्थिक कोंडी करण्याचा यामागील उद्देश होता.

दरम्यान, पिंपरी महापालिकेच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यात येतात. महापालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने मोफत बस पास देण्यात येतो. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना ही सुविधा देताना त्यांच्याकडून बस पासच्या पंचवीस टक्के रक्कम भरून घेतली जाते, तर उर्वरित रक्कम महापालिका अदा करते.

महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या सन 2018-19च्या अंदाजपत्रकामध्ये विविध उपक्रम या लेखाशिर्षाखाली 4 कोटी 85 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यातून बसपाससाठी दोन कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

3007 विद्यार्थ्यांना लाभ

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील 4 जून ते 31 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत पीएमपीच्या वतीने 3007 विद्यार्थ्यांना मोफत बस पासचे वाटप करण्यात आले आहेत. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बस पासपोटी 75 टक्के इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकारच्या पासेसची एकूण रक्कम 3 कोटी 15 लाख रुपये इतकी होते. एकूण खर्चापैकी दोन कोटी रुपये अगाऊ मिळावेत, अशी मागणी पीएमपीएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्रान्वये केली आहे. ती रक्कम देण्यात येणार असून महापालिका स्थायी समिती सभेने त्याला मंजुरी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)