‘घरकुल’साठी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार नेमणार

File photo...

अडीच लाखांचा खर्च : पर्यावरण दाखल्यासाठी अहवाल तयार करणार

पिंपरी – महापालिकेतर्फे आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरकूल प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांसाठी घरकूल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, रावेत आणि आकुर्डी या चार ठिकाणी हे घरकूल प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत घरे बांधण्याच्या कामासाठी शासनाकडून पर्यावरण दाखला आवश्‍यक असतो. तो मिळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती तयार करावी लागते.

आपत्ती व्यवस्थापन विषयक कामे करण्यासाठी शूल्क आकारणीबाबतचे दर सल्लागारांकडून मेल, पोस्टाद्वारे किंवा समक्ष मागविण्यात आले होते. त्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मेसर्स मनु सृष्टी, मेसर्स ग्रीन वर्ल्ड आणि मेसर्स ग्रीन सर्कल इंडिया लिमिटेड या तीन सल्लागारांनी दर सादर केले आहेत. त्यातही तिघांनी दर सादर करताना 18 टक्के जीएसटीसह हे दर सादर केले आहेत.

वास्तविक पाहता ही सेवा देताना म्युनिसिपल कॉन्स्टीट्यूशननुसार सूट आहे. त्यामुळे जीएसटी वगळून दराचा विचार करण्यात आला. त्यामध्ये सर्वाधिक लघुत्तम दर मनु सृष्टी यांनी सादर केला आहे. त्यांनी प्रत्येक प्रकल्पात आपत्ती व्यवस्थापन सल्लागाराचे काम 60 हजार रुपयांमध्ये करण्याचे मान्य केले आहे. महापालिकेच्या चार प्रकल्पांसाठी असा एकूण 2 लाख 40 हजार रुपये इतका खर्च येणार आहे.

दवाखान्यासाठी पावणेदोन कोटी रुपये

चिखली, प्राधिकरणातील सेक्‍टर क्रमांक 17 व 19 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांसाठी घरकूल प्रकल्प बांधण्यात येणार आहे. त्याठिकाणी आरक्षित असलेल्या जागेवर महापालिकेतर्फे दवाखाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आली होती. त्यावर मेसर्स पी. एन. नागणे, मेसर्स पवार पाटकर कन्स्ट्रक्‍शन प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स हिरेन कन्स्ट्रक्‍शन कंपनी या तीन ठेकेदार कंपन्यांनी निविदा सादर केल्या. ज्यामध्ये महापालिकेच्या निविदा दरापेक्षा सर्वाधिक कमी अर्थात 10.5 टक्के इतक्‍या कमी दराची निविदा पी. एन. नागणे यांनी सादर केली होती. त्यांनी हे काम 1 कोटी 78 लाख 51 हजार 104 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यांना हे काम देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)