चिखलीमध्ये उद्यापासून स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

पिंपरी – चिखलीतील शरदनगर येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दि. 9 ते 12 जानेवारी दरम्यान स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर, भक्त पुंडलीक पुरस्कार, स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष रामराजे बेंबडे यांनी दिली.

शरद नगर येथे सकाळी 7 ते 9 या वेळेत हे कार्यक्रम होतील. दि 9 रोजी युवा व्याख्याते औदुंबर दुधावले चरित्र अशी घडतात, दि. 10 रोजी वृषाली धर्मे यांचे मला काही सांगायचे, दि. 11 रोजी प्रा. वसंत हंकारे चला आता माणूस घडवू या विषयावर, दि. 12 रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर हे आजचा युवक उद्याची दिशा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दत्तात्रय राऊत यांना भक्त पुंडलिक पुरस्कार तर शांतीवन बीड येथील दीपक नागरगोजे यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार यांना प्रदान केला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)