दोन वर्षांपूर्वीच्या वादातून मारहाण

पिंपरी -दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मिळून तरुणाच्या डोक्‍यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरुणाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास केळगाव रोडवर घडली.

निलेश ज्ञानेश्‍वर मुंगसे (वय-18, रा. केळगाव रोड, आळंदी) या तरुणाने याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुंड्या मटकर, निषाद सुरेश भिवरे, टिल्या (सर्व रा. देहूफाटा, झोपडपट्टी, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश आणि आरोपी यांची दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून तिन्ही आरोपींनी संगनमत करून निलेशला मारहाण केली. तसेच आरोपी गुंड्या मटकर याने निलेशच्या डोक्‍यात लोखंडी रॉडने मारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)