..हा तर भाजपचा ‘चुनावी जुमला’

पिंपरी -आर्थिकदृष्ट्‌या मागास सवर्ण समाजाला आरक्षण म्हणजे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून भाजपचा पुन्हा एकदा मोठा चुनावी जुमला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सन 2014 लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ मोठीे आश्‍वासने दिली. साडेचार वर्षात ती आश्‍वासने पूर्ण केली नाही. साडेचार वर्षात सर्व स्तरावर सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराचा पुन्हा बाहेर काढला.

मात्र, हा मुद्दा ऐरणीवर आणूनही पाच राज्यात भाजप तोंडावर आपटला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्‌या मागास सवर्ण समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेसाठी हा भलामोठा लॉलीपॉप असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)