चोरीचे 114 मोबाईल जप्त

संग्रहित छायाचित्र ...

आई-मुलासह चौघांना अटक : विशेष पथकाची कामगिरी

भोसरीत दोन अल्पवयीन ताब्यात

याच 114 मोबाईलमधील 4 लाख 59 हजार 210 रुपये किंमतीचे 45 मोबाईल हे भोसरी पोलिसांनी जप्त केले आहेत. यासंदर्भात भोसरी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले आहे. या दोन मुलांनी भोसरी परिसरातील एक मोबाईलचे दुकान फोडून दुकानातील 45 मोबाईल चोरले होते. तसेत यावेळी घरफोडी मधील 2 लाख 39 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने देखील या कार्यक्रमात फिर्यादींना परत देण्यात आले. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दीड महिन्यांपूर्वी संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (रा. हडपसर) या आरोपीला अटक केली होती.

पिंपरी – चिंचवड, निगडी परिसरात मोबाईल हिसकावणाऱ्या चौघांना पोलिसांनी अखेर जेरबंद केले. यामध्ये आई-मुलाचा सहभाग आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 114 मोबाईल जप्त केले आहेत. चिंचवड पोलिसांनी जप्त केलेले 4 लाख 68 हजार रुपये किंमतीचे मोबाईल तसेच भोसरी पोलिसांनी जप्त कलेले मोबाईल व सोन्याचे दागिने असा एकुण 11 लाख 67 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगल अवदुत शर्मा (वय-55 रा. दळवीनगर, चिंचवड), लखन उर्फ बबल्या अवदुत शर्मा (वय-18, रा. दळवीनगर, चिंचवड) या आई व मुलासह लहु उर्फ लाल्या अंकुश भिसे (वय – 18, रा. दळवीनगर झोपडपट्टी) याला अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन ताब्यात घेण्यात आले आहे.

मोबाईल चोरी व चेनस्नॅचिंगचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आरोपींना अटक करत मोबाईल जप्त केले. रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या किंवा गाडीवर थांबलेल्या नागरिकाच्या हातातील मोबाईल हिसकावणे हा त्यांचा मोडस होता. लखनने चोरून आणलेले मोबाईल त्याची आई घरात किंवा इतर ठिकाणी लपवून ठेवत. आय. एम. ई. आय. क्रमांकावरून पोलिसांनी 65 मोबाईल मालकांना शोधले. यातील 36 मालकांना चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 7) बोलावून अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आले.

महागडे फोन खरेदी करताना त्यांचा विमा देखील काढा, तसेच त्याचे “ट्रॅकर ऑन’ ठेवा. त्यामुळे फोन चोरीला गेला किंवा हिसकावला तर चोराला शोधणे किंवा नुकसान भरपाईसाठी तुम्हाला मदत मिळू शकेल, असे रानडे यांनी यावेळी सांगितले.
चिंचवड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निरीक्षक विश्‍वजित खुळे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, पोलीस नाईक राजेंद्र शिरसाट, वंदना गायकवाड, विजयकुमार आखाडे, स्वप्निल शेलार, वृषीक पाटील, सचिन वर्णेकर, अमोल माने, पंकज बदाणे, गोविंद डोके यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)