जॅमरसह वाहने नेली पळवून

हिंजवडीतील घटना : दोन गुन्हे दाखल

पिंपरी -वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहनांना जॅमर लावले. वाहतूक पोलिसांचे लक्ष दुसऱ्या कामाकडे जाताच वाहन चालकांनी जॅमरसह वाहने पळवून नेल्याचे दोन गुन्हे हिंजवडी वाहतूक विभागाकडून दाखल करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक पोलिसांची नजर चुकवून सिग्नल तोडणे, वेगात वाहन चालवून सिग्नल पडण्यापूर्वी सिग्नल क्रॉस करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालवायचं आणि वाहतूक पोलीस दिसताच एखाद्या मोठ्या वाहनाच्या आडोशाने पुढे जायचे, असे अनेक प्रसंग चौकाचौकात दिसतात. अनेकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येते. मात्र काही वाहनांना वाहतूक पोलिसांनी जॅमर लावला असता वाहन धारकांनी चक्क जॅमरसह वाहन नेले.

हिंजवडी मधील जॉमेट्रिक चौकात “नो एंट्री’मध्ये एका चालकाने त्याची दुचाकी (एमएच 12, केएच 1191) पार्क केली. वाहतूक पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्या दुचाकीला जॅमर लावला. चालक दुचाकीजवळ नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या वाहतूक नियमनाच्या कामात लक्ष वळवले. याचा फायदा घेत दुचाकीस्वार बहाद्दर जॅमरसह दुचाकी घेऊन गेला.

दुसऱ्या घटनेत हिंजवडी वाहतूक विभागाजवळ एका ऑटो रिक्षाला (एमएच 12, जेएच 1770) जॅमर लावला. वाहतूक विभागाजवळ लावलेला रिक्षा जॅमरसह गायब झाली. या दोन्ही घटनांबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)