‘पवनाथडी’च्या साक्षीने विरोधकांची मोट?

विरोधी पक्षनेत्यांनी धाडले आमंत्रण : जगताप यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव

जाहीर तोफ डागणी सुरू

दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, मयूर कलाटे आणि साने यांनी भोसरीतील संतपीठ आणि वाकडमधील विविध विकास कामांच्या निविदेमध्ये रिंग झाल्याचे आरोप करत, या दोन्ही मतदार संघातील भाजप नेत्यांवर तोफ डागली होती. पवनाथडी जत्रेच्या निमित्ताने शिवसेना व मनसे गटनेत्यांना सोबत घेऊन जाण्याचा मानस असलेले विरोधी पक्षनेते दत्ता साने हे आमदार जगताप यांच्याविरोधात दंड थोपटणारे राष्ट्रवादीत परतलेले राजेंद्र जगताप आणि अपक्ष विद्यमान नगरसेवक नवनाथ जगताप यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. यानिमित्ताने जगतापविरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवीत आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेला उद्या (दि. 8) भेट देण्याचे नियोजन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केले आहे. यानिमित्ताने चिंचवड विधानसभेतील जगताप विरोधकांना आग्रहाचे आमंत्रण धाडण्यात आले आहे. याला या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी व जगताप विरोधकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधकांची मोट जुळवून जगतापांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याचा बेत आखल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रातील सांगवीत यंदा पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गतवेळची विधानसभा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी जगताप यांच्या विरोधात लढविली होती. यंदा ही निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कलाटे भावकीतील मयूर कलाटे हे इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वीच राहुल कलाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक नवनाथ जगताप यांनी त्यांना “भावी आमदार’ अशा शब्दांत शुभेच्छा देत, पिंपळे गुरव परिसरात पोस्टरबाजी केली होती. त्यामुळे लक्ष्मण जगताप आणि नवनाथ जगताप यांच्या आलबेल नसल्याचे यावरून स्पष्ट झाले.

दरम्यान, चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेला भेट देण्याचे नियोजन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, चिंचवडमधून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले राहुल कलाटे, मयुर कलाटे यांना खास निमंत्रण देण्यात आले आहे. यानिमित्ताने आमदार जगताप यांच्या विरोधकांची चाचपणी करण्याचा मानस असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून, पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात परतण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. याशिवाय मावळ लोकसभा मतदार संघातून इच्छूक असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाजपकडून नाव चर्चेत असतानाच, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थच्या मावळातील उमेदवारीच्या चर्चेने एकच खळबळ उडाली होती.

मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीची साथ सोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश राष्ट्रवादीला दत्ता साने यांचा विरोध आहे. भोसरी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या साने यांनी भोसरीबरोबरच चिंचवड विधानसभा मतदार संघातील विरोधकांची मोट बांधण्याचे काम हाती घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)