‘वाकड-हिंजवडी’ रस्ता रूंदीकरणाचा खर्च एक कोटीने वाढला

File photo

जादा दराची निविदा : एकूण खर्च 20 कोटी 55 लाखांवर

पिंपरी -वाकड येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडीपर्यंत रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 19 कोटी 58 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असताना जादा दराची निविदा आली आहे. त्यामुळे रुंदीकरण खर्च 20 कोटी 55 लाखांवर पोहोचला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाकड येथे देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीपर्यंत बीआरटी कॉरिडॉरवर रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या रस्ता रूंदीकरणासाठी 19 कोटी 58 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 19 कोटी 46 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.

त्यापैकी कृष्णाई इन्फ्रा या ठेकेदाराने सुरूवातीला निविदा दरापेक्षा 9 टक्के जादा दराने निविदा सादर केली. इतर ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर लघुत्तम होता. त्यामुळे त्यांना आणखी दर कमी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी 4.95 टक्के जादा सुधारीत दर सादर केला. सन 2018 – 19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्विकृत योग्य दरापेक्षा 7.11 टक्‍क्‍याने कमी येत आहे.

प्राप्त निविदा मंजूर दराने म्हणजेच 20 कोटी 42 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 11 लाख रूपये, टेस्टींग चार्जेस 1 लाख 68 हजार रूपये असे 20 कोटी 55 लाख रूपयांपर्यंत काम करून घेण्यात येणार आहे. म्हणजेच या कामासाठी तब्बल एक कोटी रूपये जादा खर्च होणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने थेट पद्धतीने शहरातील जुन्या पाण्याच्या टाक्‍यांसाठी सल्लागार नेमून स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा रक्कम 44 लाख 91 हजार रूपये दराने थेट पद्धतीने काम देण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी 27 पंप हाऊस केंद्र आहेत.

जमिनीअंतर्गत असणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांची संख्या 17 आहे. तर उंचावरील पाण्याच्या टाक्‍या 85 आहेत. यामध्ये जुन्या पाण्याच्या टाक्‍यांची संख्या जास्त आहे. या टाक्‍यांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट के. बी. पी. इंजिनिअरींग सर्व्हिसेस यांच्या मार्फत केले जाणार असून त्यावर सुमारे 45 लाखांचा खर्च होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)