डोळसनगरमध्ये घरात गॅस गळती,आगीत चार जण जखमी

पिंपरी – घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे घराला आग लागली. या आगीमध्ये चार जण भाजले. ही घटना रविवारी (दि. 6) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास भोसरी मधील डोळस नगर येथे घडली. या घटनेत शैलेश सदाशिव कुचेकर (वय-35), अमृता शैलेश कुचेकर (वय-30),आयुष कुचेकर (वय-6), रिंकु भगवान जाधव (वय-45) अशी जखमी नागरिकांची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोळस नगर येथे भगवान महादेव जाधव यांचे घर आहे. त्यांच्या घरात गॅस लिकेज झाल्याने पहाटे बाराच्या सुमारास घराला आग लागली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र आणि भोसरी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अग्निशमन विभागाच्या जवानांनी लगेच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरातील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. फायरमन बापूसाहेब मळेकर, सूरज गवळी, प्रवीण लांडगे, भगवान यमगर, संजय महाडिक, बाळासाहेब मोरे, राजेंद्र महाडिक, सईद शेख, महेंद्र पाठक, एन. के. तांबोळी यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)