पिंपरी – बंद दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 36 हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना 12 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चिंचवड येथील महालक्ष्मी साडी सेंटर येथे घडली. सीता भाऊसाहेब पाटील (वय-38, रा. बालाजीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीता यांचे चिंचवड येथील बालाजीनगर येथे महालक्ष्मी साडी सेंटर हे दुकान आहे. दि. 12 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 36 हजार रुपयाची रोकड पळवून नेली.