पाच जणांना उपम्यातून विषबाधा

पिंपरी  – सकाळी नाष्टा म्हणून खाल्लेल्या उपमा व ताक यातून कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना वडमुखवाडी येथे रविवारी (दि. 6) घडली. यामध्ये सहा वर्षाच्या लहान मुलीचा देखील समावेश आहे.

शिवलिंगप्पा अरळीगिड (वय-65), शांताबाई अरळीगिड (वय-60), कलप्पा शिवलिंगप्पा अरळीगिड (वय-34), मुलगी धनश्री कलप्पा अरळीगिड (वय-6) तर भाचा वीरभद्र प्ररतबाधी (वय-26) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरळीगिड कुटुंबियांनी सकाळी उपमा व ताक असा नाष्टा केला. त्यानंतर त्या साऱ्यांना उल्टी व चक्करचा त्रास सुरु झाला. त्यांना महापालिकेच्या वायसीएममध्ये दाखल केले असता त्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. विषबाधा उपम्यातून झाली की ताकामुळे याचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)