वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

पिंपरी – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे मित्रासोबत दुचाकीवरुन चाललेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. 29 जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मुंबई-बंगलुरु हायवेवरील सूर्या हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर घडली. आदित्य राजेश मिश्रा (वय 27, रा. पॅलोडिओ सोसायटी, ताथवडे) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अदनान अब्दुल खान (वय 26) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य व अदनान हे दुचाकीवरुन शनिवारी रात्री मुंबई-बंगलुरु हायवेने चालले होते. सूर्या हॉस्पिटल समोरील रस्त्यावर एका भरधाव अज्ञात वाहनाने मागून येऊन अदनान याच्या दुचाकीला धडक दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)