पिंपरी – “नो इंट्री’मध्ये जाण्यापासून रोखल्याने कारमधील दोघांनी वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावत जात शिवीगाळ करत त्यांना नोकरी घालवण्याची धमकी दिली. या प्रकरणी कारचालक आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.30) रात्री साडेदहाच्या सुमारास डांगे चौकात घडली.
राहुल शशिकांत जगदाळे (वय 39, रा.वर्धमान वाटिका, थेरगाव) आणि राहुल अर्जुन माने (वय 29, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई महेश शंकर भोर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.