पिंपरी -वाल्हेकरवाडी येथे एका 51 वर्षीय इसमाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. निवृत्ती रामभाऊ आब्दल (वय-51, रा. वाल्हेकरवाडी) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अक्षय राठोड, राजा राठोड, संभाजी कुंभार, रोहीत राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निवृत्ती यांच्या आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. आरोपींनी संगनमत करुन निवृत्ती यांना लोखंडी रॉडने डोक्यावर व हाता पायावर मारहाण करुन गंभीर जखमी केले.