पिंपरी -पोस्टातील विविध तंत्रज्ञान आणि सेवांची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व पोस्ट कार्यालयात मेळाव्याचे सोमवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले आहे. त्यात शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना पोस्टाबद्दल माहिती सांगण्यात येणार आहे.
कोअर बॅंकिग सोल्युशन, कोअर इन्शुरन्स सर्व्हिस, कोअर सिस्टिम इंटिग्रेशन, आधार नोंदणी, इंडिया पोस्ट पेमेंट्स व अद्यावत सेवा याबाबत सर्विस्तर माहिती देण्यात येणार आहे.