36 अनुदानित वसतिगृहांच्या हस्तांतरणाची होणार कार्यवाही

File photo

पिंपरी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आयुक्‍त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखालील राज्यातील मान्यता रद्द केलेली 36 अनुदानित वसतिगृहे हस्तांतर व स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 करिता इच्छूक स्वयंसेवी संस्थांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव व अर्ज मागविण्यात आले आहेत.

राज्यातील 36 अनुदानित वसतिगृहे हे स्वयंसेवी संस्थांना हस्तांतर करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे अर्ज समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्‍त कार्यालय व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद या कार्यालयांमध्ये 2 जुलै 2019 पासून उपलब्ध केले जाणार आहेत.

24 जुलै 2019 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे प्रस्ताव अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्यातील ठाणे, अमरावती,गोंदिया, लातूर प्रत्येकी -1, धुळे-3, जळगाव-2, अहमदनगर -2, पुणे-2, सांगली-2, वाशिम -4, वर्धा-12, भंडारा-3 या जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्या स्वयंसेवी संस्थांना वसतिगृहे सुरु करावयाचे आहे, त्यांनी प्रस्ताव सादर करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)