पिंपरी – मुलीसोबत रस्त्याने पायी चाललेल्या वडिलांना तिघांनी मिळून सिमेंटचा गट्टू डोक्यात मारुन जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.25) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील रमाबाईनगर येथील किराणा दुकानासमोर घडली.
कल्याण सुर्यकांत काकनाटे (वय 30, रा. रमाबाईनगर, गिरजुबाबा मंदिराजवळ, पिंपरी) असे जखमी वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय सावंत (वय 23), अनिकेत मोरे (वय 22, रा. रमाबाईनगर, पिंपरी) आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास कल्याण हे त्यांच्या मुलीला घेऊन रमाबाईनगर येथील साबळे यांच्या किराणा दुकानासमोरुन चालले होते. यावेळी आरोपी एका इसमाला मारत होते. तो इसम कल्याण यांच्या अंगावर पडला. यामुळे कल्याण आणि त्यांची मुलगी दोघेही खाली पडले. कल्याण यांनी आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला.