दोन वर्षांत 14 हजार शौचालयांची उभारणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात भारत स्वच्छ अभियानार्तंगत 2017 पासून आजपर्यंत 14 हजार वैयक्‍तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. झोपडपट्टी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात शौचालये बांधण्यात आली आहेत. याबाबतची आकडेवारी महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, अशी माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सभागृहात दिली.

सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करून महापालिका प्रशासनाला धारेवर घरले. यावर उत्तर देताना आयुक्‍त श्रावण हर्डीकर म्हणाले की, शहरात 2017 नंतर सुमारे 14 हजार वैयक्‍तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. शौचालयांची ड्रेनेज लाईनला जोडणी करण्यासाठी काही अडचणी आहेत. त्या दूर केल्या जातील. वैयक्‍तिक शौचालयांची सर्व कामे पूर्ण झाल्याचे तपासूनच संबंधितांच्या खात्यावर अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे.

“शेल्टर’ची भरीव कामगिरी

सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत शेल्टर या संस्थेकडून झोपडपट्टी धारकांना शौचालय उभारणीसाठी मदत केली जात आहे. त्याअंतर्गत शौचालयासाठी लागणारे साहित्य दिले जात आहे. आतापर्यंत या संस्थेने शहरात पाच हजार शौचालये उभारली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.