कडाक्‍याच्या थंडीमुळे आरोग्य बिघडले

File Pic

दिवस-रात्र गारठा : रुग्णांच्या संख्येत वाढ

पिंपरी – शहरात गेल्या दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. दिवसभर थंडी जाणवत असून या सततच्या गारठ्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले असल्याने शहरामधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

हिवाळ्यातील खाण्यासाठी उपयुक्‍त पदार्थ

– गाजर, कांदे, पालक, हिरव्या बीन्स हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.
– तुळस, आले, गवती चहाच्या पानांचा चहामध्ये वापर केल्यास शरिरामध्ये उष्णता निर्माण होते.
– बाजरी, ज्वारी, मका, जवळी, रागी रोजच्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावीत.
– आहारात दाल, भाज्या आणि सूप घ्यावे.
– जेवणात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन “सी’ या सारख्या पौष्टिक स्रोतांचा समावेश करावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थंडीचा पारा अचानकपणे चार अंशांपर्यंत खाली घसरला आहे. ही घसरण विक्रमी मानली जात आहे. दिवस-रात्र तीव्र स्वरूपाचा गारठा जाणवत आहे. कामधंद्यांच्या व्यापात थंडीच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करत शहरवासीयांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील दवाखाने, रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. गारठ्यामुळे अंगदुखी, दाढदुखी तसेच जुन्या व्याधींनी डोके वर काढले आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव म्हणाले, सध्या कडाक्‍याची थंडी सुरू झाली आहे. त्यातच हवामान कोरडे असल्याने धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

दमा असणाऱ्या रुग्णांचाही त्रास वाढला आहे. थंडीमधील अतिसार, श्‍वसनविकार, थंडीताप, विषाणूजन्य ताप, दमा, कोरडा खोकला येणे असे रुग्ण सध्या आढळतात. थंडी हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने सर्वात उत्तम आहे. मात्र, अचानक झालेल्या हवामान बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.

थंडीच्या काळात पौष्टिक खाद्य, सुका मेवा, फळांचा आहार घेणे फायदेशीर ठरते. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने व्यायाम करावा. विषाणूजन्य आजार पसरण्याची शक्‍यता जास्त असल्याने रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी जाताना रुग्णांनी तोंडाला रुमाल बांधावा. थंडीच्या काळात हळद-दूध, कॉफी, तुळशीचा चहा यांचे सेवन करावे. शिळे अन्नपदार्थ, उघड्यावरील पदार्थ, दही, लस्सी यासारखी थंडपेय टाळावेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)