पिंपरी – दोन्ही मुलीच झाल्याने “तू सोडचिठ्ठी दे’, असे म्हणून मारहाण करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2016 सालापासून सुरु होता. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती अझहर कुदरततुल्ला सय्यद, दिर हनीफ कुदरततुल्ला सय्यद, जाऊ रेश्मा हनीफ सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला घरगुती करणावरुन तसेच दोन्हीही मुलीच झाल्यामुळे आरोपी वारंवार शिवीगाळ करुन उपाशीपोटी ठेवत होते. तसेच “तू सोडचिठ्ठी दे’ असा दबाव आणून पिडीत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला व जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 2016 सालापासून सुरु होता. हा त्रास असह्य झाल्याने अखेर महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.