पिंपरी – रिक्षा लावण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत दोघांनी एका रिक्षाचालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन गंभीर जखमी केले.
ही घटना शुक्रवारी (दि.7) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी आंबेडकर चौकातील रिक्षा स्टॅण्डवर घडली. मेहबुब गुडलाल चिकनगिरी (वय 23, रा. कासारवाडी) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुनील म्हेत्रे आणि कैलास म्हेत्रे (दोघे रा. खराळवाडी, पिंपरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.