पिंपरी – इमारतीवर दगडं का मारला? असा जाब विचारल्याने दोघा जणांनी मिळून एकाला चामडी पट्ट्याने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि.7) रात्री दिडच्या सुमारास निगडी ओटास्कीम येथील पीसीएमसी कॉलनी बिल्डींग समोर घडली.
संदिप काळुराम धोत्रे (वय 41, निगडी, ओटास्कीम) असे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोन्या रागपसरे आणि छोट्या छत्री (दोघे रा. पीसीएमसी कॉलनी, ओटास्कीम, निगडी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.