पिंपरी – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका तरुणाला मारहाण करुन त्याच्या हातावर कोयत्याने वार जखमी केले. ही धक्कादायक घटना बुधवार (दि.29) रोजी रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील बापुजीबुवा चौकाजवळील कठड्यावर घडली. अक्षय बाळू कंद (वय 26, रा. गव्हाणे तालीम शेजारी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अमोल जानकर (वय 27, रा. आदिनाथ नगर भोसरी) तसेच त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय याच्यासोबत किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून आरोपी अमोल आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून बुधवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरीतील बापुजीबुवा चौकाजवळील कठड्यावर उभा असलेल्या अक्षय याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या डाव्या हातावर कोयत्याने वार करुन जखमी केले.