रावेत बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढणार!

510 एमएलडीची वाढ : दोन ठिकाणी आढळले मोठे खडक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी पवना नदीपात्राचे ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात नदीपात्रात दोन ठिकाणी मोठ्या उंचीचे खडक आढळले आहेत. याशिवाय अर्धा मीटरने बंधाऱ्याची उंची वाढविल्यास 250 एमएलडी ; तर एक मीटर उंची वाढविल्यास पाणी साठवण क्षमतेमध्ये 510 एमएलडीची वाढ होणार आहे. पंप हाऊसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास या उपलब्ध पाणीसाठ्यातून शहराची दोन दिवसांची तहान भागविणे शक्‍य होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तत्कालीन लोकसंख्येनुसार पाणी वापर तसेच भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन बांधण्यात आला होता. हा बंधारा 50 वर्षे जुना झाला आहे. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकात महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्या वाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा अधिक झाले आहे. रावेत बंधाऱ्याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. सद्यस्थितीत रावेत येथील बंधाऱ्यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 30 एमएलडी जलउपसा करते.

रावेत येथील बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधाऱ्याची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येतात. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्यस्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी असल्याचे पाटंबधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. त्यानंतर महापालिकेने ड्रोनद्वारे केलेल्या आठ किलोमीटरच्या सर्वेक्षणात नदीपात्रात दोन ठिकाणी मोठ्या उंचीचे खडक आढळले आहेत. जॅकवेलपासून अनुक्रमे चार व 26 मीटर अंतरावर आढळले आहेत.

या सर्व्हेक्षणात बंधाऱ्याची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्‍याची पाण्याची पातळी तपासणे आवश्‍यक आहे. हे काम तातडीने करणे आवश्‍यक असल्याने पाटबंधारे विभागामार्फत ड्रोन सर्व्हेक्षण करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणात या बंधाऱ्याची उंची वाढविण्याचे दोन प्रस्ताव विचारधीन आहेत. अर्धा मीटरने बंधाऱ्याची उंची वाढविल्यास बंधाऱ्याची पाणीसाठवण क्षमता 250 एमएलडीने वाढणार आहे. तर एक मीटरने उंच वाढविल्यास, दुपटीने म्हणजेच 510 एमएलडी पाणी साठवणूक क्षमता वाढणार आहे. हे सर्वेक्षण जलसंपदा विभागाला सादर केल्यानंतर महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित बंधाऱ्याची संयुक्त पाहणी केली जाणार आहे. त्यादरम्यान 50 वर्षे जुना असलेल्या या बंधाऱ्याची स्थिरता तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार अर्धा की एक मीटर उंची वाढविणे योग्य ठरणार आहे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

पूररेषेपेक्षा “बॅक वॉटर’ची उंची कमी

या सर्वेक्षणात अर्धा व एक मीटर उंची वाढविल्यास रावेत बंधाऱ्यापासून आठ किलोमीटरपर्यंत पाण्याची उंची किती असू शकेल, याची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये पूरनियंत्रण रेषेचा देखील अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पूरनियंत्रण रेषेनुसार 565 डॅम टॉप उंची असणार आहे. तर एक मीटरने बंधाऱ्याची उंची वाढविल्यास पाण्याची पातळी 562.7 एवढी उंची असणार आहे. याशिवाय सध्या पवना बंधाऱ्याची लांबी 200 मीटर असून, उंची वाढविल्यास या बंधाऱ्याची लांबी 30 मीटरने वाढविला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)