पिंपरी : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 15 वाहनांवर खटले

संग्रहित छायाचित्र........

पिंपरी – पीएमपीने आपले घटलेले उत्पन्न वाढविण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेऊन धडक कारवाईला सुरुवात केली आहे. मागील आठ दिवसांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 15 खासगी वाहनांवर वाहतूक पोलिसांच्या मार्फत खटले दाखल केले असल्याची माहीती पीएमपीएमएलचे समन्वयक संतोष माने यांनी दिली.

खासगी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पीएमपी आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई सुरु केली आहे. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त विनायक ढाकणे यांची मदत घेऊन कारवाईसाठी दोन पोलीस अधिकारी सोबत घेतले आहेत. दि. 8 मे ते 14 मे या दरम्यान पीएमपीएल व वाहतूक पोलिसांच्या पथकाने 15 खाजगी वाहनांवर कारवाई केली आहे.

चार खासगी बस, एक मिनी बस, एक सहा सीटर आणि नऊ तीन सीटर गाड्यांवर खटले दाखल केले आहेत. तसेच चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पुढील काळात ही कारवाई तीव्र केली जाणार असल्याचे समन्वयक संतोष माने यांनी सांगितले. ही कारवाई समन्वयक अधिकारी संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक सोनवणे, कुंडलिक भापकर, बाबासाहेब बंडगर करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)