पिंपरी – भाडेकरुने राहत असलेली खोली सोडावी, यासाठी झालेल्या वादातून भाडेकरु दाम्पत्यास शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.12) मोशी, तुपेवस्ती येथील गणेशनगरमध्ये घडली. याप्रकरणी दत्तात्रय दगडू पाचंगे (वय 37, रा. मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राम सुरेश अवचिते (वय 35, रा. माया निवास, तुपेवस्ती गणेशनगर मोशी) आणि शहा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय हे सुरेश अवचिते यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहतात. खोली सोडावी यासाठी फिर्यादी व आरोपींमध्ये वाद झाला. आरोपी राम आणि शहा या दोघांनी दत्तात्रय याला शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या दत्तात्रय यांच्या पत्नीला देखील मारहाण करुन शिवीगाळ केली.