पिंपरी – दुचाकी व पोल्ट्रीफॉर्मसाठी पैशाची मागणी करून पत्नीला शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना हिंजवडी येथील बावधन येथील सत्यमश्रेय अपार्टमेंट येथे 2018 ते 10 मे 2019 दरम्यान घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुमीत सुरिंदर कौल (वय- 28) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 27 वर्षीय पिडीत महिलेचे लग्न झाल्यापासून आरोपी सुमीत हा तिला दुचाकी घेण्यासाठी व पोल्ट्रीफॉर्मच्या व्यवसायाला जागा घेण्यासाठी पैशाची मागणी करुन शिवीगाळ व मारहाण करीत होता. तसेच पीडित महिलेच्या नावावर असलेली चारचाकी गाडी तिच्या परस्पर स्वत:च्या नावावर करून फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.