पिंपरी -दुकान घेण्यासाठी माहेरहून सहा लाख रुपये आण, म्हणून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निगडी येथे 9 मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. सुरक्षा अमोल मस्के (वय-23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
तिचे वडील लक्ष्मण महादेव थोरात (वय-45 रा. भोरीभडक, पो. भोरीअहीमली, ता. दौंड) यांनी निगडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल दत्तू मस्के (वय- 26), दत्तू रामा मस्के (वय- 62) व केसरबाई दत्तू मस्के (वय- 55 सर्व रा. संजय नगर निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरक्षा हिचा 2016 साली अमोल मस्के याच्यासोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर दोन वर्षांपासून सुरक्षा यांचा नवरा, सासू व सासऱ्याकडून दुकान घेण्यासाठी माहेरहून सहा लाख रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सुरक्षा हिने दि. 9 मे रोजी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.