विद्यानंदमध्ये रंगला क्रीडा महोत्सव

निगडी – येथील विद्यानंद भवन विद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. हार्मनीही संकल्पना घेऊन सुमारे सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध क्रीडा प्रकारांचे सुंदर सादरीकरण केले.

यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या हस्ते विविध क्रीडा प्रकारात विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी भारतीय योग संघाचे कप्तान चंद्रकांत पांगारे, सच्चिदानंद एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील, प्रा. डी. आर. करनुरे, विश्वस्त डॉ. जे. जी. पाटील, श्वेता पाटील, सुप्रिया पाटील, नगरसेविका शर्मिला बाबर, सुमन पवळे, नगरसेवक सचिन चिखले, समीर जवळकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी मार्गदर्शन करताना पांगारे म्हणाले की, जन्मापासून मृत्यूपर्यंत करता येणारा,विनाखर्च सहज साध्य असणारा, सर्व खेळांचा पाया असणारा योगा सर्वांनी केल्यास उत्तम आरोग्य लाभेल. त्याची सुरुवात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून करावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी केले.

दुसऱ्या दिवशी बालचित्रवाणीचे निर्माते ज्योतिराम कदम यांचे हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे प्रमुख पाहुणे होते. या वेळी ज्योतिराम कदमांनी उत्स्फूर्त नाट्यमय भाषणातून पालकांना उद्‌बोधन केले. विद्यार्थ्यांना कथेद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व विषद केले.

प्राथमिक विद्यालयाच्या मुलांनी विविध रंगीबेरंगी पेहरावात बांबू नृत्य, लेझीम, रिबन, एरोबिक्‍स, सूर्यनमस्कारासारखे क्रीडा प्रकार सादर केले. प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यपिका सविता किरंगे यांनी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत वार्षिक अहवाल सादर केला. अर्चना बनवली यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यपिका छाया हब्बू, सविता किरंगे, क्रीडा शिक्षक साहेबराव जाधव, शीतल म्हेत्रे, योगेश जाधव, मनीषा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)