पिंपरी -अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना कुरुळी गावाच्या हद्दीत चिंबळी फाटा येथे घडली. भाऊसाहेब दत्तु भवर (वय 50, रा. चिंबळी फाटा, मोशी) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 19 एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास भाऊसाहेब हे चिंबळी फाटा येथून पायी जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत भाऊसाहेब गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवार (दि. 30 एप्रिल) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.