#लोकसभा2019 : मतदानासाठी अमेरिका ‘टू’ पिंपरी!

रहाटणीतील मतदान केंद्रावर बजावला हक्‍क

पिंपरी – मतदानाच्या दिवशी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर केली जाते किंवा मतदानासाठी कामांच्या वेळांमध्ये सूट दिली जाते. मात्र, तरीही अनेक जण मतदान करण्याबाबत फारसे उत्सुक नसतात. किंबहुना या दिवशीचा सुट्टीचे गैरफायदा घेत लोक बाहेरगावी फिरायला जाणे पसंद करतात. तर काही जण वेळ नसल्याचे सांगत मतदान करणे टाळतात. मात्र, अशा सर्व लोकांना लाजवेल असे काम पिंपरी, रहाटणी येथील मुळचे रहिवासी आणि आता कामानिमित्त अमेरिका येथे स्थायिक झालेल्या त्रिवेदी कुटुंबियांनी.

जय आणि कविता त्रिवेदी हे दोघेही आयटी इंजिनिअर आहेत व अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करतात. ते खास अमेरिकेतून मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत. आज त्यांनी आपला मतदानाचा हक्कही बजावला.

नोकरीनिमित्त अमेरिकेत असणारे त्रिवेदी यांनी लोकसभा मतदानासाठी आवर्जून वेळ काढत आज आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. रहाटणी येथील तांबे येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. जगात कुठेही असलो तरी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने मायदेशी परतणे आवश्‍यक आहे, असे सांगताना याच भावनेने आपणही आपल्या गावी येऊन मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.

मतदानासाठी आपण भारतात एकटेच आलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगतात, त्यांच्याप्रमाणेच आमचे काही मित्रही अमेरिकेतून पुण्यात मतदानासाठी आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)