पिंपरी : साडेतीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे 14 रुग्ण

पिंपरी – शहरात गेल्या साडेतीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे 14 रुग्ण आढळले आहेत. तर, दोघांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होवू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

1 जानेवारीपासून आजअखेर 3 हजार 144 रुग्णांना टॅमिफ्ल्यू गोळ्या देण्यात आल्या आहेत. 45 रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये 14 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आज दिवसभरात 42 जणांना टॅमिफ्ल्यू गोळ्या देण्यात आल्या. 4 रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यातील एका रुग्णाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे उपचारानंतर स्पष्ट झाले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)