जमीन मालक, ग्राहकांची फसवणूक

पिंपरी – वेळेत गृहप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण न केल्यामुळे जमीन मालकाचे नुकसान व ग्राहकांचीही फसवणूक केल्याचा गुन्हा बिल्डरविरोधात भोसरी एमआयीडीस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमीन मालक तानाजी महादू आल्हाट (वय-65 रा.मोशी) यांनी फिर्याद दिली असून प्रताप बाळासाहेब ढमाले (रा. कोथरूड) व प्रकाश रामकिसन खेतावत (रा. वारजे) या दोन बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी आल्हाट यांनी त्यांची जमीन गृहप्रकल्प बांधण्यासाठी म्हणून प्रताप व प्रकाश या दोन बिल्डरांना दिली होती मात्र दोन्ही बिल्डरांनी नियोजित वेळेत बांधकाम करुन न दिल्याने तानाजी यांचे 5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा तानाजी यांनी केला आहे. तर अभिजीत कुदळे व राजमती देवकर या दोन ग्राहकांनीही वेळेत फ्लॅटचा ताबा न देऊन 37 लाख 97 हजार 125 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)