गाडी चालवायला दिली नाही म्हणून कोयत्याने वार

पिंपरी -नवीन गाडी चालवायला दिली नाही म्हणून तरुणावर कोयत्याने वार कऱण्यात आल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली आहे. याप्रकरणी आकाश सोमा अंभेरे (वय-18 रा. नवी सांगवी) याने फिर्याद दिली असून अश्‍विन चव्हाण, केतन चंडिले, विपुल चव्हाण, मोन्या संकपाळ, अभिमन्यू पाचपुरे, ऋतिक लांडगे, शुभम नावळे, उदय निकम, स्वप्निल गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व त्यांचा मित्र आयुष कोलप नवीन दुचाकीवरून पिंपळे-गुरव येथे आले असता आश्‍विन व इतर मित्रांनी आकाश अडवले व नवीन गाडी चालवायला दे, अशी मागणी केली. आकाश याने नकार दिल्याने चिडून सर्व आरोपींनी आकाश व त्याच्या मित्राला माराहाण करत कोयत्याने डोक्‍यावर व हातावर वार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)