सफाई कामगारांचा सोमवारी मोर्चा

पिंपरी – शहरातील दैनंदिन साफसफाई करणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने सोमवारी (दि. 24) महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या साफसफाई कामगारांना महापालिकेने कामावर घेवून कंत्राटी पद्धत बंद करावी, त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, 6 वर्षावरील कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, मानधनावर काम केलेल्या सफाई कामगारांना त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) मिळावा व घरकुल योजनेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे आदी मागण्यांसाठी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून ते महापालिकापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)