पिंपरी : वैद्यकीय सुविधेच्या सक्षमीकरणाची मागणी

पिंपरी – शहरातील नागरिकांना माफक दरात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्याऐवजी या सुविधेचे खासगीकरण करण्यावर महापालिका प्रशासनाकडून भर दिला जात आहे. ही बाब भविष्यात अडचणीची ठरू शकते. त्यामुळे महापालिकेने वैद्यकीय सुविधा सक्षमीकरणावर भर देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय सुविधेच्या केंद्रबिंदू स्थानी वायसीएम रुग्णालय राहिले आहे. मात्र,या रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी भोसरीत 100 बेड क्षमतेचे रुग्नालय बांधून ते खासगी संस्थेला 30 वर्षे एवढ्या दीर्घ मुदातीवर चालवायला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर केला आहे. तो विंखंडीत करावा.

याशिवाय ह्दयरोगाशी संबंधित असलेल्या रुबी अलकेअर संस्थेला वायसीएमच्या आवारातच जागा उपलब्ध करुन दिल्यानंतरही या संस्थेत उपचारांसाठी येणारा खर्च शहरातील अन्य खासगी रुग्णालयांच्या वैद्यकीय बीलांएवढाच येत आहे. याशिवाय थेरगाव, मासुळकर कॉलनीत उभारलेले नेत्र रुग्णालय देखील पूर्ण झालेले नाही. या सर्व रुग्णालयांचे काम तातडीने मार्गी लावून, रुग्णसेवेसाठी खुली करण्याची मागणी वाघेरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)