प्लॉट, गाडीसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी -जागा खरेदी व गाडीसाठी माहेरुन पैसे आण म्हणून 27 वर्षीय विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पतीसह सारच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 वर्षीय पीडित महिलेने (रा. इंद्रायणीनगर, आळंदी) दिघी पोलीस ठाण्यात पती किशोर भानूदास धोत्रे, सासू गंगूबाई धोत्रे, सासरा भानुदास किसन धोत्रे व दीर विजय धोत्रे (सर्व रा. शहागड, जालना ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर याच्याशी पीडितेचा 2015 साली विवाह झाला. लग्नांनतर पीडितेचे स्त्रीधन काढून घेऊन, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करीत जमीन व दुचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आण, अशी मागणी केली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)