शहरातील चित्रकाराची पहिल्यांदाच न्यूयॉर्कमधील प्रदर्शनात चित्रे

पिंपरी -उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील कलाकारही शहराचे नाव आता आतंरराष्ट्रीय स्तरावर नेत आहेत. पहिल्यांदाच शहरातील चित्रकार सुनील शेगावकर यांच्या चित्रांना न्यूयॉर्कमधील प्रदर्शनात स्थान मिळत आहे. न्युयॉर्क येथे “आर्ट एक्‍स्पो’ या चित्रकला प्रदर्शनात शेगावकर यांच्या 14 चित्रांचा समावेश केला जाणार आहे. न्यूयॉर्क येथे भरवल्या जाणाऱ्या आर्ट एक्‍सपो या प्रदर्शनात 600 कलाकांराची चित्रकला सादर होणार आहे. भारतातून सात ते आठ जणांची निवड झाली असून महाराष्ट्रातून शेगावकर हे एकटेच या प्रदर्शनासाठी निवडले गेले असून दि. 4 ते 7 एप्रिल पर्यंत भरणा-या या प्रदर्शनास जागतिक स्तरावरील लाखों चित्रकार व कलाप्रेमी भेट देतात.

यासंदर्भातील माहिती देण्यासाठी पिंपरी येथे पत्रकार परिषदेचे मंगळवारी (दि.26)आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलारंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी माहिती देताना सांगितले की, श्री साई सत्‌चरित्र चित्ररुपाने साकारुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणारे प्रसिध्द चित्रकार सुनील शेगांवकर यांनी काढलेल्या खजुराहो येथील चित्रांचे प्रदर्शन न्युयॉर्कमध्ये “आर्ट एक्‍स्पो’ येथे भरविण्यात येणार आहे. शेगांवकर यांनी श्री साई बाबांच्या जीवनावर आधारित शंभरहून अधिक चित्रे पाच फुट बाय आठ फूट कॅनव्हासवर साकारली आहेत.

यावेळी बोलताना शेगावकर म्हणाले की, खजुराहो म्हणजे केवळ कामुक व नग्न मूर्ती हा समज खूप चुकीचा आहे. दहाव्या शतकातही भारतीय समाज हा किती प्रगत होता व शिल्पातून किती उत्तम प्रकारे सादरीकरण केले होते ते पाहणे महत्वाचे होते. भारताची हीच कला मला माझ्या चित्रातून पुन्हा जगासमोर मांडायची आहे. त्यासाठी 14 चित्र तिथे नेत आहे. मात्र ही चित्रशृंखला पुढे अशीच कायम ठेऊन 25 चित्र यातून साकारायची आहेत व त्याचे भारतातच प्रदर्शन भरवायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)