पिंपरी : विरोध झुगारुन प्राधिकरणाने गृहप्रकल्प पूर्ण करावेत -कष्टकरी संघर्ष महासंघ

-अनेक गृहप्रकल्पांचे काम केवळ विरोधामुळे रखडल्याचा आरोप

-ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करुन काम सुरू करण्याची मागणी

पिंपरी -पिंपरी चिंचवड़ नवनगर विकास प्राधिकरणाकडून होत असलेली कष्टकरी, सर्वसामान्यासाठीचे गृहप्रकल्प पूर्ण होऊ नयेत, यासाठी शहरातील काही व्यावसायिक प्रयत्नशील आहेत. मात्र हा विरोध झुगारुन गृहप्रकल्प पूर्ण करुन त्याचे कष्टकरांना हक्‍काचे छप्पर उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यानी प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

उल्लेखनीय बाब अशी की, गेल्या काही वर्षांपासून प्राधिकरणाचे कित्येक प्रकल्प रखडले आहेत. कष्टकऱ्यांना घर मिळावे, यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाने पुढाकार घेतला आहे. यावेळी इरफान चौधरी, चंद्रकांत कुंभार, सैफुल शेख , आबा शेलार, बालाजी इंगळे, राजेश माने आदी उपस्थित होते.

महासंघाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.26)श्र- कार्यकारी अभियंता अनिल सूर्यवंशी यांचेशी चर्चा केली. त्यानंतर सेक्‍टर 30 आणि 32 येथील काम बंद असलेल्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. पिंपरी चिंचवड़ नवनगर विकास प्राधिकारणाकडून अनेक वर्षांपासून केवळ घोषणा केली जात आहे. वर्षानुवर्षे सर्व सामान्याना घराची स्वप्ने दाखवली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही होत नाही. सन 2016 मध्ये पेठ क्र.30व 32 येथे निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्प सुरु करण्याचे आदेश दिले. मात्र भूमीपूजनापूर्वीच विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विरोध झाला.

त्यानंतर महासंघाने यावेळी आंदोलने केली. अखेर कामास सुरूवात झाली. मात्र दुर्दैवाने तीन वर्षात केवळ 25 टक्के काम कसेबसे पूर्ण होऊ शकले आहे. संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून काम वेगाने सुरु करण्याची मागणी केली. तसेच पेठ क्रमांक 12 येथील सुमारे 5000 नियोजित गृहप्रकल्पाला होणारा किरकोळ विरोध लक्षात न घेता या गृहप्रकल्पाचे काम तातडीने हाती घ्यावे. अन्यथा कष्टकऱ्यांच्या गृहप्रकल्पांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)