पिंपरी : नगरसेवक कामठे यांच्या जात दाखल्याची फेरतपासणीचे आदेश!

पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. 26 ब मधून निवडून आलेले नगरसेवक तुषार कामठे यांच्या जात प्रमाणपत्राची तीन महिन्यात फेरतपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ही माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

तुषार कामठे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पिंपळे निलख प्रभागातून (प्रभाग क्र. 26 ब) मागास प्रवर्गातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यासाठी त्यांनी “कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र निवडणूक विभागाला सादर केले होते. त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर सचिन साठे यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर साठे यांचे म्हणणे विचारात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने तुषार कामठे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरतपासणी आगामी तीन महिन्यात करण्याचे आदेश पुणे जात पडताळणी समितीला दिले असल्याचे साठे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)