मध्यस्थी करायला बोलवून केली मारहाण

पिंपरी -भांडणात मध्यस्थी करण्यासाठी बोलावून तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना पिंपरीतील विठ्ठलनगर येथे घडली. आकाश बळीराम खळगे (वय-25, रा. बालाजीनगर, भोसरी) आणि अमोल गोपीनाथ पंडीत (वय-30, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बाबासाहेब काळुराम जाधव (वय-27, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास विठ्ठलनगर येथे दोन मित्रांची भांडणे सुरू होती. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी त्या दोघांनीही फिर्यादी जाधव यांना बोलविले. मात्र जाधव हे दुसऱ्या मित्राची बाजू घेत असल्याचा समज आरोपी खळगे याचा झाला होता. यामुळे खळगे आणि त्याचा नातेवाईक पंडीत या दोघांनीही जाधव यांची मोटार फोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)