मुलींना जन्म दिला म्हणून विवाहितेचा छळ

पिंपरी -तीन वेळा मुलींना जन्म दिला म्हणून 28 वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार चिखली येथे घडला असून पती विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली असून अनिल रामनयन भारती (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिलेला एकापोठापाठ तीन मुली झाल्या त्यामुळे पती अनिल हा तिचा गेल्या काही वर्षांपासून मानसिक व शाररिक छळ करीत होता. यामध्ये त्याने पीडीत महिलेचे डोके भिंतीवर आपटून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच वारंवार मारहाण केली. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)