पिंपरी : व्यापाऱ्याला मारहाण; खंडणीखोरांना अटक

पिंपरी -भोसरी येथील एका व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करत मारहाण केल्याचा प्रकार रविवारी (दि.24) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

लक्ष्मण वाघोजी दळवी (वय – 75 रा. दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी मुन्ना उर्फ राजेश रविशंकर तिवारी (वय-22 रा. चिखली), अमित चंद्रकांत सोनवणे (वय-24 रा. दिघी रोड, भोसरी), विजय मनबहाद्दुर थापा (वय-23 रा. लांडेवाडी, भोसरी) या तीन खंडणीखोरांना पोलिसांनी अटक केली असून अल्पेश मुरकर व त्याचे इतर साथीदार फरार आहेत.

फिर्यादी लक्ष्मण यांचे भोसरी येथील दिघी रोडवर सागर प्रोव्हिजन स्टोअर नावाचे दुकान आहे. या दुकानात रविवारी लक्ष्मण काम करत असताना सहा ते सात जण तेथे आले व त्यांनी फिर्यादीकडे 2 हजार रुपयांची खंडणी मागून मारहाण केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)