पिंपरी : मतदान जनजागृतीसाठी संघटनांची मदत

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी विधानसभा मतदार संघ, मतदार जागृती कार्यक्रमाबाबत सूचना देण्यासाठी शासकीय, निमशासकीय व महाविद्यालय प्रतिनिधींचे ऑटो क्‍लस्टर येथे सोमवारी (दि.25) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मतदानाची टक्केवारी 100 टक्‍क्‍यांपर्यंत आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणुन 399 चुनाव पाठशाळांची निर्मिती करुन त्यांच्यामार्फत मतदार प्रशिक्षित करणे, चुनाव पाठशाळांच्या नोडल ऑफीसर व सहाय्यकांनी सायकल रॅली काढणे, रांगोळी स्पर्धा घेणे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन 100 टक्के मतदान होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय, निमशासकीय, पब्लिक सोसायटी, ग्रुप्स मेडिया आणि सामाजिक संस्था, संघटना, तसेच शैक्षणिक संस्था एनसीसी, एनएसएस तरुणांच्या संघटना, ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीने मतदान वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)