नगरसेवकांचा विमा रद्द करुन गोरगरिबांना मदत करण्याची मागणी

पिंपरी – महापालिकेच्या स्थायी समितीने नगरसेवकांना मोफत विमा देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव रद्द करावा त्या ऐवजी झोपडपट्टीतील गरिब महिलांना जीवनावश्‍यक वस्तूचे वाटप करावे, अशी मागणी असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या स्थायी समितीने झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना प्रत्येकी 2 ब्लॅकेट, चादर, दरी पंजा, बेडशीट या वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मंजुरी देखील देण्यात आली होती. मात्र, तीन महिने उलटले तरी याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण घोषीत, अघोषीत मिळून 92 झोपडपट्ट्या असून येथे राहणारा प्रत्येक नागरिक हा असंघटीत कामगार आहे. नगरसेवकांना दिला जाणारा विमा हा निव्वळ पैशाची उधळपट्टी असून याला रद्द करावे व या गरजू लोकांना तत्काळ आठ दिवसांत मदत करावी अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर शहराध्यक्ष सुंदर कांबळे, सचिव मनोहर वाघमारे, बबन शिरसाठ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)