पंधरा लाखांची वीज चोरी; तिघांवर गुन्हा

पिंपरी -महावितरणतर्फे 15 लाख रुपयांची वीज चोरी केल्या प्रकरणी तक्रार देण्यात आली असून भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महावितरणचे अधिकारी प्रदीप प्रकाश उपाध्ये (वय-49 रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली असून गणेश लक्ष्मण झगडे, योगेश चंद्रकांत झगडे व ऋषीकेश चंद्रकांत झगडे (सर्व राहणार, चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

महावितरणेने केलेल्या तक्रारीनुसार, तीनही आरोपींनी मागील सहा महिन्यात 15 लाख 63 हजार930 रुपयांची 65 हजार 310 युनिट्‌सची वीज वापरली आहे. त्यानुसार तिघांवरही 2003च्या 135 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here