पिंपरी : पाच दिवसांत 607 बॅनर्सवर कारवाई

14 वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा

आचारसंहितेमुळे महापौर राहुल जाधव यांच्या दोन वाहनांसह एकूण 14 वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहेत. त्यामध्ये नगरसचिव कार्यालयाअंतर्गत सात आणि महापालिका वाहन कार्यशाळेअंतर्गत सात अशी एकून 14 वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

पिंपरी – लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर पाच दिवसांत शहरातील एकूण 607 राजकीय बॅनर्स काढून टाकण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक जाहिर झाल्यानंतर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

या दैनंदिन कारवाईचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक जाहिर झाल्यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे.

-Ads-

त्यामध्ये 24 तास, 48 तास आणि 72 तासांत करावयाच्या विविध प्रकारच्या कार्यवाहीचा समावेश आहे. यामध्ये महापालिका मालमत्ता व आवारातील राजकीय पुढाऱ्यांचे फोटो, बॅनर्स व मतदारांवर प्रभाव पाडू शकणारे लिखाण झाकण्यात आले आहे. त्यामध्ये महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनांचा समावेश आहे.

ही कार्यवाही अचारसंहिता लागू जाल्यानंतर 24 तासांत करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. याशिवाय शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनर्स, अनधिकृत फ्लेक्‍स हटविण्यासाठी 48 तासांची मुदत आहे. तर खासगी जागेत लावलेले फ्लेक्‍स हटविण्यासाठी 72 तासांची मुदत देण्यात आली आहे. 11 मार्च रोजी 46, 12 मार्च रोजी 23, 13 मार्च रोजी 67, 14 मार्च रोजी 282, 15 मार्च रोजी 189 असे एकूण 607 बॅनर्स काढले आहेत.

दरम्यान, ही मुदत संपल्यानंतरही अनेक राजकीय बॅनर्स आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. शहराच्या विविध भागांत ही कारवाई करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)